पेट्रोल दरवाढी विरोधात युवक काँग्रेस तर्फे केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : बल्लारपुर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार व पूर्व खा.नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाथ जिल्हाउपाध्यक्ष करण पुगलिया च्या नेतृत्वात युवक काँग्रेस बल्लारपुर अध्यक्ष चेतन गेडाम यांनी पेट्रोल दरवाढी विरोधात निषेध केले. भारत देश सध्या कोरोणा च्या दुसऱ्या टप्प्यातून सावरत असताना, केंद्र सरकार मात्र विविध जीवनावश्यक गोष्टीवर दरवाढ करून सर्वसामान्य जनते ला छडण्याचे काम करत आहे.

मागील सहा वर्षापासून देशामध्ये भाजपाचे सरकार आहे, सबका साथ सबका विकास, सर्वसामान्य, मजुरांच, शेतकऱ्यांचा सरकार अशा घोषणा देऊन भाजपा सरकार सत्तेत आलं, परंतु भाजपा सरकारने शेतकरी गरीब सामान्य सर्वसाधारण जनतेची निराशा केली आहे, आता जणू भाजपा सरकार हे उद्योग पत्त्यांच सरकार आहे की काय? आणि उद्योग धारांचा फायद्यासाठी हे सरकार काम करते काय असे जनतेला वाटू लागले आहेत. कोरोनाच्या काळात असंख्य युवकांचे रोजगार गेल्याने हे युवक बेरोजगार झाले, आणि आज डिझेल ९० च्या पार पेट्रोल शंभरच्या पार आणि गोड्या तेलाचे भाव १५०च्या वर तसेच गॅस सिलेंडर ९०० पर्यंत गेले आहे व महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आली आहे, त्यामुळे सर्वसाधारण जनतेला कुटुंबाचा वाहन चालवतांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे.

मागील काही दिवसापासून इंधन दरवाढीचा भडका उडाला असून पेट्रोल डिझेल चे भाव सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत त्यामुळे केंद्र सरकारने ही दरवाढ कमी करावी यासाठी बल्लारपुर युवक काँग्रेस तर्फे पेट्रोल पंपावर जाऊन चेतन गेडाम च्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरुद्ध निषेध आंदोलन केले. यावेळी सिकंदर खान, शंकर महाकाली, अज़हर शेख,संदीप नक्षिणे,चंचल मून, सोहेल खान, रोशन ढेगळे,संजीव सुददाला,तपन उगले, श्रीकांत गुजरकर, राहुल घुंगरूळ,अक्षय वाढरे,साहील शेख, तिरुपति दासरी, अक्षय पपुलवार यांची प्रमुख उपस्थिति होती.