नागभीड (चंद्रपूर) : तालुक्यातील सावरगाव येथील इसार पेट्रोल पंप जवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात आजी ठार तर नातू गंभीर जखमी झाला. ही घटना रविवार (ता. १०) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
मृत आजीचे नाव पुष्पा फुलचंद ठिकरे, (वय ६५, रा. सावरगाव) तर जखमी नातवाचे नाव लोकेश अरुण बोरकर, (वय २१, रा. वैजापूर) असे आहे.
लोकेश बोरकर हा आजी पुष्पा फुलचंद ठिकरे हीला दुचाकीवर घेऊन चंद्रपूर-नागपूर हायवे वरून तळोधीच्या दिशेने जात होता. याचदरम्यान समोरून विरुद्ध दिशेने दुचाकी येत होती. सावरगाव जवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर या दोन्हीही वाहनांची आमने-सामने धडक झाली. यात पुष्पा फुलचंद ठिकरे ह्या जागीच ठार झाल्या. तर तिचा नातू लोकेश अरुण बोरकर हा गंभीर जखमी झाला. जखमीला ब्रह्मपुरी येथे तातडीने हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आकाशकुमार साखरे, ए.एस.आय. भानारकर, दिलीप चौधरी, सुरेश आत्राम यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सुरू आहे.