जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात घुग्घुसचे अनेक महिला व युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

याप्रसंगी कृषीउत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शोभाताई ठाकरे, शहर अध्यक्ष राजू रेड्डी, माजी शहर अध्यक्ष जावेद सिद्दीकी, कांग्रेस नेते निरंजन डंबारे व शेखर तंगलापेल्ली, युवक काँग्रेसचे तौफिक शेख, तिरुपति महाकाली, सुरज कन्नूर, गणेश उईके, अनिरुद्ध आवळे, कल्याण सोदारी, अजय उपाध्ये, विजय मटला, पवन नागपुरे, शिवा तंगलापेल्ली यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

युवक काँग्रेसचे नेते सिनु गुडला यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सदानंद कलवेनी, तिरुपती गोडगू, मनोज चिकाटे, अजित गेडकर, संपत सेवनतुला, राजेश मल्लारप, सचिन दुर्वे, यशवंत तक्कला, अंजय्या इरगुराला, रवी सिंदोला, अशोक जंगम, निरंजन कोरकंटी, वृषभ नलभोगा, संजय कोटा, रंगनाथ शेट्टी, प्रेम गणगोनी, संकेत पाटील, गणेश कोटगीलवार, शंकर अटकापुरम, दिनू वर्मा, मुरलीकृष्ण गुडला, माणिकचंद तग्रपवार, सुभाष अरेल्ली, मन्नू शर्मा, ज्योती टूस्से, विजया गुडला, महेश्वरी शेट्टी, स्वरूपा भुसावेणी अश्या अनेक युवकांनी व महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.