चंद्रपुर : चंद्रपूर मूल मार्गावरील जानाळा फाट्याजवळ अज्ञात ट्रकची दोन दुचाकी वाहनाला धडक देत ट्रक चालक ट्रकसह फरार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात प्रदीप वसंत मानकर वय वर्ष 41 व विनोद तुळशीराम मानकर वय वर्ष 35 या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे दोघेही भावंड असल्याची प्राथमिक माहिती आहे.
यांच्या सोबत असलेले गजानन मुरलीधर वैरागडे (मारोडा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. अजयपूर येथून आपल्या गावी मारोडा येथे परत जात असतांना हा अपघात घडला.
अपघातात एकाच कुटुंबातील दोन व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त कळताच संपूर्ण मूल परिसरात व मारोडा गावात शोककळा पसरली आहे