भंडारा : नजीकच्या गराडा बु. येथे एका विहिरीत वाघाचे दोन लहान बछडे मृतावस्थेत आढळून आले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली असून घटनास्थळी वन अधिकारी दाखल झाले आहेत.
भंडारा पासून १० किमी अंतरावर गराडा बू. गाव असून गाव शिवारातील जंगल परिसरात एक विहीर आहे. या विहिरीत वाघाचे दोन लहान बछडे मृत्यू पावल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. अधिकाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला आणि दोन्ही बछड्यांना बाहेर काढले.
या ठिकाणी एका वाघिणीचे पायाचे ठसे सापडले आहेत. परंतु ती दिसून आली नाही.
तिचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे परिसरातील गावकरी दहशतीत आहेत. बछडे यांचा मृत्यू विहिरीत बुडून की घातपात आहे याचा अधिक तपास वन विभाग करीत आहे.