कुडेसावलीच्या स्मशानभूमीत मादी बिबट मृतावस्थेत आढळला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील कुडेसावली गावातील स्मशानभूमीत मादी बिबट आज बुधवारी (12 मे) ला सायंकाळ सुमारास मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. वनविभागाने घटनास्थळी येवून पंचनाम करून मृतदेह शविचछेदनाकरीता पाठविले आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यातील वनविभागाच्या आवळगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत हळदा बिटातील संरक्षीत वन कक्ष क्रमांक ११७८ मध्ये कुडेसावली पासून १०० मिटर अंतरावरील गावातील स्मशानभूमीत एक मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. काही नागरिक सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास फिरायला गेले असता, दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी त्या परिसरात पहाणी केली असता त्यांना बिबट्याचा मृतदेह पडून असल्याचे दिसला. लगेच वनविभागाला माहिती देण्यात आली.

दक्षिण ब्रम्हपुरी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एल.शाह मॅडम सोबतच मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी विवेक करंबेकर हे घटनास्थळी पोहोचले. मृतावस्थेत आढळून आलेला बिबट हा अंदाजे ३ वर्षे वयाची मादी बिबट आहे. मृत बिबट दक्षिण ब्रम्हपुरी वनविभागाच्या आवळगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत हळदा बिटातील, संरक्षीत वनक्षेत्र कक्ष ११७८ मध्ये आढळून आला. वनविभागाचे अधिकाऱ्यांनी मोक्का पंचनामा करून बिबट्या चा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण सध्या कळले नाही. शरीरावरील सर्व अवयक पूर्ण शाबून असल्याची खात्री वनाधिकाऱ्यांनी केली आहे.