घुग्घुस : येथील तुकडोजी नगर, जनता कॉलेज रोड वॉर्ड क्रं. सहा मधील वर्ष 2014 मध्ये लाखो रुपयांच्या शासकीय निधीतून निर्माण करण्यात आलेली इमारत भाजप शहर अध्यक्षांच्या भावाने आपल्या कब्जात घेऊन गेली सात वर्ष मुलांन तर्फे शिकवणी फी घेवून व्यवसायीक कराटे प्रशिक्षण देत होते.
या अवैध कब्जा विरोधात काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर तहसीलदार साहेबानी सदर इमारत सील करून नगरपरिषदेच्या ताब्यात घेतले.
सहा नंबर वॉर्ड हा खूप मोठा असून येथील नागरिकांना लसीकरणा करीता जिल्हापरिषद शाळा, राजीव रतन रुग्णालयात जावे लागत होते नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. या इमारतीत कोरोना महामारी पासून बचावासाठी लसीकरण केंद्र शुरू करण्याची मागणी काँग्रेस नेते राजुरेड्डी, रोशन पचारे यांनी केली होती.
या मागणीची दखल घेऊन सदर इमारतीत 5 ऑगस्ट रोजी लसीकरण केंद्र शुरू झाले असून आजपर्यंत ऐकून बाराशे चवतीस अठरा ते चौरेचाळीस वयोगटातील लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला असून
ही शासकीय इमारत जनसेवेच्या उपयोगात येत असल्याने नागरीकांनी आनंद व्यक्त केला आहे.