भाजपच्या माजी सभापती पाझारेच्या गावात काँग्रेसचे वॉटर टँकरने पाणी पुरवठा

चंद्रपूर : भाजपचे जिल्हापरिषद सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांचे नकोडा हे गाव नकोडा – मारडा क्षेत्राचे ते प्रतिनिधित्व करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांचे क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या गावातच पाणी टंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती शुरू आहे.

आय एस ओ ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या गावात आता काँग्रेसने पाणीपुरवठा शुरू केला आहे.
ग्रामपंचायततीत भाजपचीच सत्ता असतांना देखील सत्ताधाऱ्यांना गावातील पाणीप्रश्न सोडविता आला नाही ही शोकांतिका आहे.

पाच हजार सहाशे चौतीस इतकी लोकसंख्या असलेला हा गाव औद्योगिक, गुन्हेगारी, तसेच राजकारणामूळे सतत उभ्या महाराष्ट्रात चर्चेत राहते मात्र मागील अनेक दिवसांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे.

ISO प्राप्त ग्रामपंचायती मध्ये पाण्याची तीन लाख साठ हजार गैलन लिटर क्षमता आहे. मात्र आज गावातील आई – बहिणीनां पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. येथील पाणी पुरवठा करणारी यंत्रणेत बिघाड आल्याने गावातील नागरिकांवर पाणी संकट ओढवले या संकटाच्या काळात घुग्घुस काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजूरेड्डी हे नागरिकांच्या मददतीला धावून आले असून सध्या रेड्डी हे आपल्या खाजगी वॉटर टँकर द्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करत आहे.