ISO प्राप्त ग्रामपंचायतला वॉटर टँकरने पाणी पुरवठा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : नकोडा – मारडा जिल्हापरिषद क्षेत्रातील नकोडा हे पांच हजार सहाशे चौतीस लोकसंख्या असलेला प्रमुख गाव आणि गावालगतच जिल्ह्यातील प्रसिध्द एसीसी सिमेंट कंपनी आहे.

या गावामधूनच माजी जिप सभापती, माजी पंचायत समिती सभापती झाले असून आज या गावातील नेते जिल्हापातळीवर राजकिय क्षेत्रात आपले नावलौकिक करीत आहे. औद्योगिक रित्या, गुन्हेगारी, तसेच राजकारणामूळे चर्चेत राहणारे हे गाव मागील अनेक दिवसांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे.

आय एस ओ प्राप्त ग्रामपंचायती मध्ये पाण्याची तीन लाख साठ हजार गैलन लिटर क्षमता आहे
मात्र आज गावातील आई – बहिणीनां पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

येथील पाणी पुरवठा करणारी यंत्रणेत बिघाड आल्याने गावातील नागरिकांवर पाणी संकट ओढवले या संकटाच्या काळात खाजगी वॉटर टँकर द्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करत आहे.