मित्रानीच केली मित्राची हत्या; वरोरा येथील गांधी चौकातील घटना

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : नेहमीप्रमाणे कामावर जातो म्हणून घरून निघून गेलेल्या तरुणाची त्याच्याच मित्राने हत्या केल्याची घटना आज गुरुवारी (13 मे) ला वरोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकात सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडली. सुखराम वसंता आलम (वय 26), रा.अंबादेवी वॉर्ड ,वरोरा असे मृताचे नाव आहे. तर आरोपी निलेश ढोक वय 20 रा,.राममंदिर वॉर्ड वरोरा असे आरोपी मित्राचे नाव आहे.

मृतक सुखराम हा मूळचा भद्रावती तालुक्यातील पाहुणा येथील रहिवासी होता सध्या तो कामासाठी रा.अंबादेवी वॉर्ड ,वरोरा येथे वास्तव्यास होता. मृतक सूखराम आणि आरोपी निलेश ढोके हे चांगले मित्र होते.

सुखराम हा ट्रॅक्टरवर कामावर जातो म्हणून घरून निघून गेला होता. परंतु मृतक आणि त्याचा मित्र आरोपी यांच्यात सायंकाळी साडेचारच्या सुमारास वरोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकात दोघात भांडण झाले. या भांडणात आरोपी मित्र निलेश ढोके याने खिशातील चाकूने सुखराम गळ्यावर व शरीराच्या इतर भागावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. आणि मृतकच्या पत्नीला मी सुखराम ला मारले असल्याची बातमी सुद्धा दिली. त्यानंतर मृतक गांधी चौकात रक्ताच्या थारोळ्यात पडून असता स्वतः आरोपीनेच आपल्या दुचाकीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला. परंतु,उपचारादरम्यान सुखरामचा मृत्यू झाला. मृतक आणि आरोपी हे दोघे मित्र होते आणि पैशाच्या वादातून त्यांच्यात भांडण झाल्याचे सांगितल्या जात आहे.
घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चावरे तर पोलीस उपनिरीक्षक बेलसरे
हे करीत आहे.