अजय आणि माधूरीचा संसार फुलण्याआधीच मावळला

 पंधरादिवसापूर्वीच झाले होते लग्न

चंद्रपुर : शहराला लागून असलेल्या दुर्गापूर येथील लष्कर कुटुंबियातील सात सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर यापैकी मुलगा अजय आणि नवविवाहिता सून माधुरी यांचा पंधरवड्यापूर्वी विवाह पार पडला होता. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याने अजय आणि माधुरी हिचा संसार फुलण्या आधीच मावळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

 

चंद्रपूर पासून हाकेवर दुर्गापुर शहर वसलेले आहे. या शहराच्या आसपास कोळसा खाणी आहेत. महाऔष्णीक वीज केंद्र आहे. त्यामुळे दुर्गापुर परिसराची व्यापकता वाढत आहे. आज मंगळवारी सकाळपासून दुर्गापुरातील वार्ड क्रमांक 3 मध्ये रमेश लष्कर यांच्या कुटुंबातील सातही सदस्यांचा जनरेटर मधून झालेल्या गॅस गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे चंद्रपूर शहर आणि दुर्गापुर हळहळले आहे. या सातजणांमध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये मुलगा अजय आणि नवविवाहिता सून माधुरी यांचा पंधरवड्यापूर्वी विवाह झाल्याची माहिती आली आहे.

कोरोणा काळात लाॅकडावून नंतर विवाह सोहळ्यावर निर्बंध लावले गेली. विशिष्ट मर्यादित संख्येमध्ये विवाहाला परवानगी देण्यात आली तर कोरोणाच्या भीतीमुळे अनेक कुटुंबीयांनी विवाह सोहळे रद्द केलीत. दोन वर्षाच्या कार्यकाळात कोणाची दुसरी लाट ओसरल्यानंतर विशिष्ट संख्येमध्ये विवाह सोहळ्याला परवानगी देण्यात आली. याच कार्यकाळात लष्कर कुटुंबातील अजय लष्कर यांचा विवाह नागपुरातील माधुरी यांच्याशी जोडल्या गेला. होऊ घातलेल्या विवाहामुळे लष्कर कुटुंबीयांनी आनंदित होऊन तयारी केली आणि पंधरवड्यापूर्वी सर्वांच्या साक्षीने 28 जून रोजी विवाह सोहळा आटोपला. नवविवाहिता सासरी आल्यानंतर चार दिवसांनी परत माहेरी गेली. आठ दिवस माहेरी राहिल्यानंतर काल सोमवारी ती पुन्हा परत सासरी आली. अजय आणि माधुरी त्याच्या संसाराला आता सुरुवात होणार तेवढ्यात सोमवारी त्यांच्यावर अचानक संकट कोसळले. झोपेत असताना जनरेटर मधून झालेल्या गॅसगळतीमुळे सगळी सदस्य बेशुद्धावस्थेत रातभर घरात पडून राहिलेत. सकाळी शेजाऱ्यांनी घरातून बाहेर काढून सातही जनांना चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात भरती केले. त्यामध्ये मुलगा अजय आणि सून माधुरी चा समावेश होता. सात पैकी सहाजणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. फक्त सासू तेवढी जिवंत होती. दरम्यान तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

महिनाभरापासून लग्नाची तयारी करून विवाह सोहळा झाल्याचा आनंद आणि आता संसार फुलविण्याचा अशा द्विगुणित आनंदात असलेल्या लष्कर कुटुंबावर मंगळवारच्या पहाटेला काळाने घाला घातला. सातही सदस्यांनी अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०), दासू रमेश लष्कर(४०) यांनी जगाचा निरोप घेतला. त्यात नुकताच विवाह पार पडलेल्या अजय आणि माधुरी हिनेही जगाचा निरोप घेतला. आणि संसार फुलण्याअगोदरच मावळल्या गेला. आनंदाचे क्षण दुःखात बदलले. अजय आणि माधुरीचा मृत्यू मनाला चटका लावून गेला.