शेतात जात असताना भीषण अपघातात दोन शेतकऱ्यांसह एका बैलाचा मृत्यू

चंद्रपूर : नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जात असताना एका सिमेंट भरलेल्या ट्रकने बैलगाडीस जोरदार धडक दिली. या यामध्ये बैलगाडी घेऊन जाणाऱ्या दोन शेतकऱ्यांसह एका बैलाचा जागीच मृत्यु झाला आहेत. सकाळच्या सुमारास बामणी – आष्टी मार्गावरील कळमना गावात घडली आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी काही काळ महामार्ग रोखून धरला. घटनास्थळी पोलिस पाचारण झाले असून, महामार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करीत आहे.

सिमेंट भरलेल्या एका अज्ञात ट्रकने बैलगाडीस जोरदार धडक दिली. या यामध्ये बैलगाडी घेऊन जाणाऱ्या पुंडलिक काळे (५२) आणि अंबादास दुधकोहळे (४८) दोघेही रा. कळमना येथील आहे. या अपघातात एका बैलाचाही मृत्यू झाला आहे. सदर अपघातग्रस्त वाहन आष्टी मार्गाकडे जात होते. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळाहून पळ काढला आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी काही काळ महामार्ग रोखून धरला.

मात्र,घटनास्थळी पोलिस पाचारण झाले असून, महामार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, गावकरी माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. नुकसान भरपाई मिळेपर्यंत महा मार्ग मोकळा होणार नाही अशी ठाम भूमिका गावकर यांनी घेतली आहे.