…आणि अस्वलाच्या पुढे ताडोबाची वाघीण झाली नतमस्तक

◆ पर्यटकांची थरार अनुभवण्याची संधी हुकली

चंद्रपूर : वाघाच्या लक्षणीय संख्येमुळे जगप्रसिद्ध ठरलेल्या ताडोबा जंगलात आज पर्यटकांना एक दुर्मिळ तेवढाच वाघीण आणि अस्वलाचा सयोरासमोर येण्याचा क्षण अनुभवायला मिळाला. एक वाघीण रस्तागमन करताना अचानकपणे एक मोठी अस्वल त्याच्यामागून येऊन थेट उभी झाली अन पर्यटक क्षणभर दचकले.

अस्वल अन वाघीण तसे एकमेकांचे शत्रू समजले जातात. त्यामुळे त्याच्यात व्दद होणार असा कयास पर्यटकांनी लावला. अशात अस्वल दोनदा उभी झाली. आणि ताडोबाची वाघीण अस्वलापुढे नतमस्तक झाली. पण काही क्षणातच ती तिथून निघून गेली. ताडोव्याच्या जंगलातील आजच्या या क्षणाने उपस्थित पर्यटकांना मोठीच पर्वणी मिळाली.

चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात वाघीण आणि नर अस्वलाच्या झुंजीचा थरार बघायला मिळण्याचा योग पाहता पाहता हुकला. समोरासमोर आलेल्या या वन्यजीवानी घेतलेल्या लढाईच्या पवित्र्यामुळे क्षणभर पर्यटक थबकलेच. नर अस्वलाने जंगलाच्या राणीला न जुमानता डावाची तयारी केली होती. मात्र हा प्रसंग काही क्षणात टळला.

ताडोबाच्या देवाडा जंगलात व्याघ्र सफारीसाठी आलेले पर्यटक या लुटुपूटूच्या लढाईने आनंदी झाले. वन्यजीवप्रेमी रणवीरसिंग गौतम यांनी हा थरार कॅमेऱ्यात कैद केला.