कोरोना रुग्णांच्या सेवार्थ वेकोलिचे चारही क्षेत्रीय हॉस्पिटल त्वरित अधिग्रहित करावे – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात सर्व सुविधा, सुसज्ज असे वेकोलि (WCL) चे चारही हॉस्पिटल अधिग्रहणास विलंब हा सामान्य जनतेच्या जीवाशी छळ आहे. कोरोना बाधितांची विक्रमी आकडेवारी जिल्ह्यात वाढत असतांना चंद्रपुर, घुग्घुस, माजरी, बल्लारपूर (सास्ती) असे चारही क्षेत्रीय हॉस्पिटल जिल्हा प्रशासनाने त्वरित अधिग्रहित करून कोरोना रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करून नागरिकांमध्ये कोरोना संबंधी वैद्यकीय सेवा तसेच औषधोपचार बाबतीत वाढत असलेली भीती कमी करावी अशा सूचना आज पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केल्या आहे. जिल्हा प्रशासनाशी चर्चा करतांना चंद्रपूर क्षेत्रीय हॉस्पिटल सामान्य रुग्णालय रूपात कार्यांवित होणार असल्याची माहिती यावेळी अहीर यांनी दिली.

वेकोलिच्या या क्षेत्रीय हॉस्पिटल मध्ये डॉक्टर्स अन्य स्टाफ उपलब्धता तसेच ऑक्सिजन पाईप लाईन चे काम पूर्ण झाले असल्याची माहिती आज वेकोलि सीएमडी नागपूर श्री मनोजकुमार यांनी आज पुन्हा सायंकाळी झालेल्या चर्चेतून दिली असल्याची अहीर यांनी सांगितले. संबंधित मागणी व सूचना मागील वर्षी १४- १५ मार्च रोजी प्रत्यक्ष भेट व स्थळ बैठकीतून हि सूचना केल्या होत्या व मान्यताही मिळाली होती याचे स्मरण करून देत असलेल्या सुविधेचा फायदा न घेणे हे न पटण्यासारखं असून नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. याची जाणीव जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास यांनी वेकोलि चे क्षेत्रीय हॉस्पिटल त्वरित अधिग्रहित करण्याची कार्यवाही ची मागणी हंसराज अहीर यांनी केली आहे.

जिल्ह्यात सुसज्ज असलेल्या ४०० खाटांचे हॉस्पिटल तयार असतांना डॉक्टर्स अभावी यातुन कोरोना रुग्नांची सोय होत नसल्याची जिल्हा व्यवसथापनाचे म्हणने असल्याने आयएमए च्या डॉक्टर्स नी त्यांच्या सेवाभावातून कोरोना रुग्णसेवेत समर्पण वृत्तीने रुग्णसेवा देण्यासाठी पुढाकार घेत जिल्हा आपत्ति व्यवस्थापनास सहकार्य करण्याची विनंती यावेळी अहीर यांनी केली आहे.