भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

• डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण

चंद्रपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार मा.बाळु धानोरकर यांनी वरोरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आज सकाळी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

समता, स्वातंत्र्य, बंधुता या मानवी मूल्यांची जपणूक करणारा, आधुनिक विचारांची कास धरत परिवर्तनाकडे कूच करणारया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असा समाज घडवण्याचा
संकल्प जयंती दिनी करू असे सांगुन नागरीकांना भिम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.करोनाच्या पार्श्वभूमीवर महामानवाची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करूया असे आवाहन केले.
याप्रसंगी वरोरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास टिपले,वरोरा नगर पालिकेचे गटनेते गजानन मेश्राम,सलीम पटेल ऊपस्थीत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर महामानवाची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करूया असे आवाहन केले.