तृतीयपंथीयांना खासदार बाळू धानोरकरांच्या मदतीचा हात

चंद्रपूर : तृतीयपंथीयांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यांना रोजगाराचे पुरेसे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कौशल्य असूनही तृतीयपंथीय जगण्यासाठी रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात लोकांना आर्थिक मदत मागत असतात. अनेकांकडून त्यांना हिन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यामुळे त्यांना समाजात स्थान मिळवूण देण्यासाठी तसेच वेळोवेळी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर हे धावून आले आहे. कोरोना मुळे देखील त्यांच्यावर देखील संकट आले आहे. आज चंद्रपूर इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती याच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रझा, युवक इंटक जिल्हा अध्यक्ष प्रशांत भारती, उजनगर सरपंच मंजुषा येरगुडे, ट्रान्स्पोट जिल्हा अध्यक्ष इरफान शेख, ट्रान्स्पोट जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप सिंग, बावरे, शुभम रॉय, जिल्हा सचिव राहीन शेख, आदित्य खान, अशरफ खान, ताजुद्दिन शेख, आलोक चवरे, संजय वासनिक, आमीर शेख, महेश लांडगे, अगरसे यांची उपस्थिती होती.

खासदार बाळू धानोरकर यांनी तृतीयपंथी लोकांची आस्थेने विचारपूस करीत संवाद साधला. त्यांच्या समस्या, समाजाकडून अपेक्षा काय आहेत हे ही जाणून घेतले. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण राष्ट्रीय पातळीवर हा आवाज उचलणार असे आश्वासन त्यांनी दिले.