जातीवाचक अपशब्द वापरल्याबद्दल मुनमुनदत्ताला अटक करा :

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

•चंद्रपुरात भारतीय सुदर्शन समाज महासंघाची अटकेची मागणी

चंद्रपूर : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या टीव्हीवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील बबीताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रविवारी तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला. त्या विडिओ मध्ये तिने जातीवाचक अपशब्द वापरून एका विशिष्ट जातीला अपमानीत केले. तिच्या या भाष्यमुळे सुदर्शन आणि वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावले गेले आहेत. त्यामुळे मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी भारतीय सुदर्शन समाज महासंघ चंद्रपूर ने केली आहे.

मूनमून दत्ताने जाणून हेतू परस्पर सोसलं मीडिया वर आणि फिल्मी उद्योगात प्रसिद्धी मिळवण्या करिता जातीवाचक अपमानास्पद वापरले असा आरोप भारतीय सुदर्शन समाजाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मनोज खोटेनी म्हटले आहे.

दिनांक 10 मे 2021 ला रविवारी मुनमुनने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. ‘मी युट्यूबवर येणार आहे आणि मला चांगले दिसायचे आहे. मला कुण्या भंगी सारखे दिसायचे नाही,’ असे मुनमुन या व्हिडीओत म्हणताना दिसली़. तिचा हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. हा विडिओ या समाजातील लोकांच्या हाती लागताच समाजामध्ये मूनमून दत्ता चा विरोधात रोष निर्माण झाले व तात्काळ तिच्यावर जातीवाचक प्रतिबंधक गुन्हे खाली अटक करून कारवाई करावी अशी मागणी सुदर्शन समाज महासंघ चंद्रपूर केली आहे.