चंद्रपुरात म्युकोरमायकोसिसचे सापडले तब्बल २६ रुग्ण

चंद्रपूर : सध्या कोरोनाची दुसरी लाट फार वेगाने पसरत आहे. त्यात म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य रोगाचा धोका मानगुटीवर येऊन बसला आहे. चंद्रपुरात म्युकोरमायकोसिसचे तब्बल २६ रुग्ण सापडले आहेत. हा आजार कर्करोगापेक्षा दहा पट जास्त गतीने शरीरात पसरतो. यामुळे कित्येक जणांना त्यांचा जबडा, डोळे आणि जीव गमवावा लागला आहे. म्युकोरमायकॉसिस हा आजार दुर्मिळ असला तरी नवा नाही, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजे म्युकोरमायकॉसिस होतो. त्यामुळे मृत्यू होणे अशा गोष्टीपूर्वीपासूनच घडत आहे.

मात्र, कोविड -१ ९ मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे. म्युकोरमायकॉसिस
नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिकरीत्या अस्तिवात असते. मात्र, जेव्हा मानव शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते. तेव्हा तिच्या शरीरात संसर्ग होतो. या बुरशीचा कण शरीरात गेल्यावर फुफ्फुसात तसेच सायनस
यांच्यावर दुष्परिणाम होतो. याची लागण संसर्गजन्य नाही म्हणजे एकापासून दुसऱ्या माणसाला होत नाही. कोविड -१ ९ चा उपचार घेत असलेल्या रुग्णांना औषधे देण्यात येतात . जेणेकरून त्यांचा आजार बरा होईल . पण यामुळे रुग्णांच्या रोगप्रतिकारशक्तीवर वाईट परिणामहोतो.

रुग्णांना आपली तपासणी करून घ्यावी, या सगळयांमुळे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक म्युकोरमायकॉसिसचा धोका वाढतो . निवृत्ती राठोड यांनी त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या केले. डॉ .निवृति राठोड यांनी केली