चंद्रपूर : वरोरा शहरात हत्याचे सञ सुरूच असून दोन दिवसांपूर्वी मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज शनिवारी ( १५ मे ) शहरात एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना सायंकाळी ७.०० चे सुमारास शहरातील वन विभाग चे कार्यालयासमोर घडली. आबिद शेख (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे.अज्ञात मारेकरी फरार झाला आहे. मृत व्यक्ती हा सट्टाचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे.
आज शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास अज्ञात मारेक-याने त्याच्या जवळच्या पिस्तूल मधून आबिद शेख नावाच्या युवकावर गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून फरार झाला. मृतक हा वनविभागाच्या खाली असलेल्या झोपडीत बकरा व कोंबडी पालन करण्याचा व्यवसाय करीत होता. तसेच सट्टापट्टी व जुगाराचा धंदा करीत असल्याची माहिती समोर आली आहे. सदर हत्या सट्टापट्टीच्या व्यवसायातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.
या बाबत वरोरा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन घटनेची शहानिशा केली.