• 150 रुग्ण कोरोना मुक्त होवून सुखरूप घरी परतले
• ऑक्सिजन पाईपलाईन कोरोना महामारीच्या काळात रुग्णासाठी ठरते वरदान
चंद्रपूर : वेकोलिच्या कामगार व त्यांच्या परिवाराला करता तीन दशकांपूर्वी तयार करण्यात आलेले घुग्घूस येथील राजीव रतन रुग्णालय पकोरोना संकटाच्या काळात रुग्णांसाठी वरदान ठरले आहे.
तीन दशका पूर्वी पी. ए. संगमा हे कोळसा मंत्री असतांना यांच्या हस्ते वेकोलीच्या कामगार व परिवाराच्या उपचारासाठी दोन कोटी खर्च करून पन्नास ‘ बेड’ युक्त राजीवरत्न रुग्णालयाची उदघाटन करण्यात आले.
त्यानंतर 31 डिसेंम्बर 2018 रोजी रुग्णालयाला केंद्रीय रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला या रुग्णालयाचे वैशिष्ट्ये म्हणजे निर्मिती काळापासूनच रुग्णालयात ऑक्सिजनचे पाईपलाईन टाकण्यात आली. आज हेच ऑक्सिजन पाईपलाईन कोरोना महामारीच्या काळात रुग्णासाठी वरदान सिद्ध होत आहे.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेता 11 एप्रिल 2021 रोजी 28 बेड युक्त कोविड रुग्णालय निर्माण केले व परिसरातील घुग्घुस, चंद्रपूर, बल्लारपूर, माजरी व ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होवून जवळपास एकशे पन्नास रुग्ण कोरोना मुक्त होवून सुखरूप घरी परतले या रुग्णालयात व्हेंटिलेटर ची सुविधा नसतांना देखील एक ही कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही हे विशेष.
ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल नव्वद पेक्षा कमी होती असे रुग्ण मोठ्या प्रमाणात देखील बरे झाले असल्याचे माहिती डॉ. आनंद यांनी दिली तसेच कोविड रुग्णाच्या उपचारासाठी डॉ. चंद्रशेखर चौधरी (Pulmonologist) – छाती विकारतज्ञ यांनी आपल्या कुटुंबातच रुग्ण असतांना देखील अहोरात्र सेवा दिल्यानेच हे शक्य झाल्याचे कृतज्ञता डॉ. आनंद यांनी व्यक्त केली.
या रुग्णालयात दहा डॉक्टर, तीस स्टाफ नर्स कार्यरत असून वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक उदय कावले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन सेवा सुरळीत राहावी यासाठी एका वॉर रूमची निर्मिती करण्यात आली.
अचूक नियोजनामुळे रुग्णालयात कधीच ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली नाही.
रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था ही सेवा कार्या अंतर्गत करण्यात येत असून याठिकाणी आचारी ऐवजी कर्मचारी स्वईच्छेने दुपार व रात्रीचे जेवन बनवून जातात हा एक आदर्श राजीवरत्न रुग्णालयात निर्माण झाला आहे.