• महानगरपालिका आयुक्त राजेश मोहीतेंच्या उपस्थितीत सुरूवात
• ‘माझी वंसुधरा अभियान’ अंतर्गत संयुक्त अभियान
चंद्रपूर : कोरोना काळात आॅक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे महत्व आपणास कळाले. नैसर्गिकरित्या शुध्द आॅक्सिजन देण्याचे अविरत कार्य आपल्या सभोवतालची वृक्ष करित असतात. सर्व प्रकारच्या जिवांसाठी वृक्ष, जैवविवीधता यांच्या अस्तित्वाचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपण मानव मात्र प्राणवायु देणाऱ्या या वृक्षांना खिळे ठोकत आहोत. अनाधिकृत जाहीरातीचे फलक-बॅनर्स लावण्यासाठी झाडांचा वापर केला जातो. झाडांवर खिळे ठोकुन जाहीराती केल्या जात आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासांठी प्रत्येक झाड ‘खिळेमुक्त’ करण्याची गरज आहे.
याकरिता आज इको-प्रो संस्थेच्या वतीने ‘खिळेमुक्त वृक्ष’ या अभियानाची सुरूवात 15 आॅग पासुन स्वांतत्र्यदिनाचे औचित्य साधत करण्यात आली. या अभियानाचे शुभारंभ पालीका आयुक्त राजेश मोहीते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके व पालीका उद्यान निरीक्षक अनूप ताटेवार प्रामुख्याने उपस्थित होते. या अभियानात आज पठाणपुरा गेट लगतचे तर पाणी टाकी लगतच्या वृक्षांचे खिळे, फलक काढण्यात आले. यावेळी इको-प्रो चे धर्मेद्र लुनावत, ओमजी वर्मा, अनिल अडगुरवार, राजेश व्यास, सुधिर देव, अब्दुल जावेद, अमोल उटटलवार, सचिन धोतरे, जयेश बैनलवार, अभय अमृतकर सहभागी होते.
खिळेमुक्त वृक्ष करण्यास प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा
शहरात आज अनेक ठिकाणी हेरीटेज वृक्ष दिसुन येतात, या वृक्षांचे संरक्षण करण्याची जवाबदारी ही पालीका किंवा पर्यावरण संस्थेची नसुन प्रत्येक व्यक्तीची आहे. वृक्ष तोड होत असल्यास प्रत्येक नागरीकांनी यात हस्तक्षेप करीत तक्रार करण्याची गरज आहे. शहरातील विकासकामे दरम्यान वृक्ष वाचविण्याची, घराचे बांधकाम करतांना सुध्दा वृक्ष वाचविण्याची सर्वाची जवाबदारी आहे. शहरात विवीध कारणांसाठी वृक्षांना खिळे ठोकले जात असल्याने झाडांना इजा पोहचवीली जाते. याकरिता आपल्या परिसरातील वृक्षांना खिळे ठोकु न देणे तसेचे खिळेमुक्त वृक्ष करण्यास प्रत्येकांनी पुढाकार घेत या अभियानात सहभागी होण्याची गरज आहे.
आडेयुक्त वृक्ष’ – ‘देऊ वृक्षांना मोकळा श्वास’ अभियानाची सुध्दा सुरूवात
शहरात मोठया प्रमाणात विकासकामे केली जात आहेत, यात सिंमेट क्राॅकीट रस्त्याचे बांधकामाचे प्रचलन वाढले आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे या क्राॅकीटीकरणामुळे झाडांना काटोकाट कांक्रीट किंवा डांबर टाकल्याने वृक्षांचा श्वास कोंडला जातोय. यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडुन ठोस निर्देश देण्याची गरज असुन कुठलेही रोड बांधकाम करतांना वृक्षांना ‘आडे’ ठेवणे किंवा वृक्ष लावण्यास जागा ठेवुन आडे करण्याची गरज आहे. ज्या वृक्षांचा श्वास कोंडला जात आहे ती जागा मोकळी करून आडे करण्याची गरज लक्षात घेउन या अभियान अंतर्गत अशी झाडी ओळखुन त्या सभोवताल आडे करण्यात येणार आहे. याबाबत इको-प्रो संयुक्तरित्या काम करणार आहे.
राज्यात पर्यावरण विभागांकडुन राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वंसुधरा अभियान’ अंतर्गत इको-प्रो ‘खिळेमुक्त वृक्ष’ व ‘आडेयुक्त वृक्ष’ – ‘देऊ वृक्षांना मोकळा श्वास’ या अभियान राबविण्यात येणार आहे. चंद्रपूरकर नागरीकांनी आपल्या सभोवताल, घर-परिसरात अशी खिळे फलक ठोकलेली वृक्ष आढळल्यास ती खिळेमुक्त करण्याचे तर कांक्रीटीकरणामुळे वृक्षांचा श्वास कोंडलेल्या वृक्षांना मोकळा श्वास देण्यास त्या सभोवताल आडे करून घ्यावे किंवा शक्य नसल्यास महानगरपालिका व इको-प्रो ला कळवावे असे आवाहन बंडु धोतरे यांनी नागरीकांना केले आहे.