आसोलामेंढा तलावाच्या नहरात बुडून दोन युवकांचा मृत्यु

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलावाच्या नहरामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज रविवारी (15 ऑगस्ट) ला दुपारच्या सुमारास घडली. सोनू पितांबर सोरते (वय 23) रा.बामणी जिल्हा गडचिरोली व सुरज नानाजी नेवारे (वय 20) रा.पाथरी असे मृतांचे नावे आहेत.

सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या असोलामेंढा तलाव तसेच नहरावर पोहण्यास बंदी आहे. त्या दृष्टीने पाथरी चे ठाणेदार बन्सोड यांनी सुरक्षा ही लावली मात्र याच असोलामेंढा नहराचा पालेबारसा परिसरातील ही घटना घडली. दुपारच्या सुमारास सोनू पितांबर सोरते, रा.बामणी जिल्हा गडचिरोली व सुरज नानाजी नेवारे, रा.पाथरी हे सावली तालुक्यातील पाथरी ते पालेबारसा रोड वरील आसोलामेंढा नहरामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यात या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. एका युवकाने या दोघांनाही वाचविण्यासाठी नहरामध्ये उडी घेतली परंतु त्या युवकाला यश आले नाही असे प्रत्यदर्शींचे म्हणने आहे.

या घटनेची माहिती माहिती होताच पाथरीचे ठाणेदार बनसोड हे घटनास्थळी पोहचले. तसेच काही वेळानंतर त्या दोघांना बाहेर काढण्यात आले. त्या सर्वांना प्राथमिक स्वास्थ केंद्र पाथरी येथे नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत्यु घोषीत केले.