चंद्रपूर : बिबट्याच्या हल्यात आज दि.१५ बुधवारी दुपारच्या तीन वाजताच्या सुमारास सात वर्षीय बालक ठार झाल्याची घटना घडली. गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील मेंढपाळ बांधव गोंडपिपरी तालुक्या लगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी परिसरातील कंसोबा मार्कंडा येथे उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून मेंढ्या चराईकरण्याकरिता गेले होते.
एफडीसीएम कक्ष क्रमांक २१७ मध्ये सदर हल्ला झाला.देवावार कुटुंबियांसोबत त्यांचा बालक देखील होता. जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सात वर्षीय मनोज तिरुपती देवावार रा.भंगाराम तळोधी या बालकावर हला केला त्यात त्या बालकाचा जागीच मृत्यू झाला.सदर घटनेमुळे भंगाराम तळोधित हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
यावेळी जी.प सदस्य रुपाली पंदीलवार,गडचिरोली शिवसेना जिल्हा उपप्रमुख राकेश बेलसरे,अशोक खंडाळे, गणेश शिंगाळे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकाच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करा अशी मागणी घटनास्थळ गाठून वनविभागाकडे केली.