त्या कुटुंबाला लवकर न्याय मिळावा याकरिता “फास्ट ट्रॅक कोर्टात” खटला चालविणार : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर : येथे एकतर्फी प्रेमातून घडलेली घटना अतिशय दुःखद व दुर्दैवी असून नराधमाच्या विकृतीमुळे एका कुटुंबाने आपल्या जीवनाचा आधार व होतकरू मुलगी गमावलेली आहे. मनाला सुन्न करणारी ही घटना आहे.

मृत मुलीला व तिच्या कुटुंबाला लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला “फास्ट ट्रॅक कोर्टात” चालवण्यात येईल.आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रकरणाची सखोल चौकशी करून गृह विभागाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

सदर खटल्यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात येईल.