वेकोलि माजरीने रेल्वेला हाथाशी धरून २०२ घराना घर खाली करण्याचे दिले नोटीस

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 पुनर्वसन करण्याचे प्रयत्न करू; आ. सुधीर मुनगंटीवाराचे एकतानगर वासीयांना धीर

चंद्रपूर : माजरी-वेकोलि प्रशासनाने नवीन प्रकल्प उभारण्यासाठी किंवा कोळसा लोडिंगची सायडिंग बनवण्यासाठी तेथील लोकांना बेघर करता येत नाही जर तुम्हाला ती जागा खाली करून घ्यायची असेल तर पाहिले तेथील लोकांचे पाहिले मोबदला द्या व त्यांचे पुनर्वसन करा असे मत माजी वित्त मंत्री व आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार ने वेकोलि अधिकारीला खडसावले.

मुख्यमहाप्रबंधक यांनी रेलवे अधिकाऱ्यांचा गैर उपयोग करून वरोराचे रेल्वे अभियंता यांच्या स्वाक्षरी ने आंबेडकर वार्ड, बाजार लाइन, एलसीएच रेलवे लगतच्या एकशे चाळीस घराना घरे खाली करण्याचे नोटिस दिले व वेकोलि माजरी एकतानगर येथील २२ वर्षापासून वास्तव्यास असलेल्या ६२ कुटुंबीयाना घरे खाली करण्याचे नोटिस बजावले. आणि पंधरा दिवसात घरे खाली करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान या सर्वांनी माजरी-पाटाळा क्षेत्राचे लोकप्रिय जि.प.सदस्य प्रवीण सुर यांच्या कडे न्याय मागण्या करीता धाव घेतली. दरम्यान प्रवीण सुर यांनी सदर गंभीर समस्या आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली.दरम्यान आ.सुधीर मुनगंटीवार यांनी समस्येची गंभीरता लक्षात घेता तात्काळ दखल घेवून रविवारी दुपारी ३ वाजता चंद्रपूरच्या शासकीय विश्राम गृहात वेकोलि अधिकारी व अन्याय ग्रस्त नागरिकांची बैठक बोलावली.

माजी वित्त मंत्री व आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी बैठकीत उपस्थित वेकोलि अधिकाऱ्यांना सांगितले की काही जमीन सरकारी काही वेकोलिची तर काही रेल्वेची आहे.सदर नागरिक गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून याठिकाणी राहत आहे.जर तुम्हाला यांना हटवायचेच असेल तर यांना ययोग्य मोबदला द्या व त्यांचे पुनर्वसन करा या बाबत मला मंत्र्यांशी बोलावे लागेल किंवा माननीय प्रधानमंत्रीशी बोलावे लागेल तर मी बोलीन. मात्र कोणालाही बेघर करता येणार नाही असे वेकोलिच्या अधिकाऱ्यांची समजूत काढली.
बैठकीत माजी वित्त मंत्री व आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार वेकोलि माजरीचे मुख्यमहाप्रबंधक वि. के. गुप्ता, क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक राजेश नायर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर माजी जि प सदस्य विजय वानखेडे,माजरी ग्रामपंचायत सरपंच सौ छाया जंगम, ग्रामपंचायत सदस्य रवि भोगे, ज्या २०२ घरांना नोटीस मिळाले असे अन्याय ग्रस्त नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.