ट्रस्टच्या माध्यमातून शेतकरी, गोरगरीब, मजूर व सर्वसामान्य जनतेची अविरत सेवा करु – रवि शिंदे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

– सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, कार्यकर्ते व महिला बचत गटांना मार्गदर्शन

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामसंवाद सरपंच संघटना यांच्या संयुक्त विदयमाने मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत प्रशासनाच्या भरीव सहकार्याने श्रीमंगल कार्यालय भद्रावती येथे स्थापन झालेल्या केअर सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी क्षेत्रातील सुमारे दिड ते दोन हजार रुग्णांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. हे सेवाकार्य यापुढे सुध्दा अखंडपणे सुरु राहील. स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शेतकरी, गोरगरीब, मजुर व सर्वसामान्य जनतेची अविरत सेवा करू असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांनी केले.

कोविड १९ च्या प्रशासकीय निर्देशांचे पालन करीत ग्रामसंवाद सरपंच संघटना व  स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक श्रीमंगल कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या कोरोना काळात ग्रामपंचायतीची भुमिका मार्गदर्शनपर सामाजिक कार्यक्रमात रवि शिंदे अध्यक्षस्थानावरुन उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्रमात भद्रावती तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य , कार्यकर्ते व महिला बचत गटांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित  होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते रमेश राजुरकर, ॲड. पुरूषोत्तम सातपूते, डॉ. विजय देवतळे, ॲड. विजय मोगरे, जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बराटे, तहसीलदार महेश शितोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर, ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे प्रदेश सरचिटणीस , निलेश पुलगमकर, प्रा. धनराज आस्वले, माधवराव कौरासे, शरद जिवतोडे, ज्ञानेश्वर डूकरे, ॲड. देवा पाचभाई, जेष्ठ सरपंच प्रदिप महाकुलकर, जिल्हाध्यक्ष रिषभ दुपारे, महिला तालुकाध्यक्ष मनिषा रोडे, जिल्हा सचिव प्रशांत कोपूला, जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर चटप, जेष्ठ सरपंच बंडू पा. नन्नावरे, सरपंच शंकर रासेकर, विजय वानखेडे व विनोद घोडे उपस्थित होते. या प्रसंगी तहसीलदार महेश शितोळे यांनी कोरोना काळात ग्राम पंचायतीची भुमिका या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तहसीलदार महेश शितोळे यांनी त्यांच्या मनोगतात कोरोना संक्रमण कालावधीत रवि शिंदे यांच्या मालकीच्या श्रीमंगल कार्यालयातील कोविड सेंटरने केलेल्या कार्याबद्दल प्रशंसोत्गार काढले. या कार्यक्रमात इतर मान्यवरांनी सुध्दा समयोचित मार्गदर्शन केले.

रवि शिंदे पुढे म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगत आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपण तयार राहीले पाहीजे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थीक बळ देण्याचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रयत्न  सुरू आहे. शेतकरी कल्याण निधी सक्रिय करणे. शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञान कार्यान्वीत करणे. बचत गटातील महिलांना विमा सुरक्षा देणे. शेतकरी बांधवांचा अपघात विमा काढणे हा बँकेचा मानस आहे. स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भद्रावती तालुक्यातील ग्रा.पं. मध्ये  राबविण्यात येणाऱ्या उपक्रमास नेहमी सहकार्य राहील. चंद्रपूर जिल्हयातील गोरगरीब शेतकरी व शेत मंजुरांच्या मुला-मुलींचे लग्न व शिक्षण कार्यास मदत,  गरीब होतकरू विद्यार्थांना लॅपटॉप वितरण,  ग्रा.पं. च्या सहकार्याने तालुक्यातील  शिवपांदन रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी कायदेतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात प्रामाणिक प्रयत्न करून ग्रामीण जनतेला न्याय मिळवून देऊ असेही रवि शिंदे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रत्नाकर चटप, प्रास्ताविक ॲड. देवा पाचभाई व आभार प्रदर्शन विनोद घोडे यांनी केले.