अकोला : पारिवारिक कलह हा प्रत्येकाच्या घरात नित्याची बाब बनली आहे पण हा कलह विकोपाला केला तर संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी होते अशीच एक सुन्न करणारी घटना अकोला जिल्ह्यात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील बाळापूर शहरानजीक वाहणाऱ्या मन नदी पात्रात युवकाचा मृतदेह आढळून आला. तसेच पुलावर स्कुटी मोटार सायकल क्रमांक (एम.एच. २८ ए.वाय. ७३४०) ही दिसून आली. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी मजुरांना विचारणा केली असता दोन जणांनी नदीपात्रात उडी घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून बाळापूर पोलिसांनी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपतकालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला. दीपक सदाफळे यांच्या पथकाद्वारे नदीपात्रात दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेह आढळून आला नव्हता. दरम्यान, मृत युवकाचा मामा गणेश गोविंद पाटील (रा बुलडाणा) याने बाळापूर पोलिसात फिर्याद दिली की, त्याची बहीण मनिषा गोविंद पाटिल हिचा विवाह बाळापूर नाका, अकोला येथील रहिवासी प्रकाश चितरंग यांच्यासोबत झाला होता.
त्यांना प्रसाद हा एकुलता एक मुलगा आहे. बहीण मनिषा चितरंग ही आरोग्य विभागात नोकरी करते. जावाई प्रकाश चितरंग यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर मनिषाने त्याच विभागातील व्यक्तीशी लग्न केले; मात्र बुधवारी सायंकाळी मनिषाचा मुलगा प्रसादचा मृतदेह नदीपात्रात आढळला, तर मनिषाही बेपत्ता असल्याने तिनेही नदीपात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करीत बचाव पथकाचे शोध कार्य हे युद्ध पातळीवर सुरूच होते. आज सकाळ पासून संतगडगे बाबा बचाव पथक परत बचाव कार्याला लागले असता या सर्च ऑपरेशन मध्ये पथक प्रमुख दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी सर्च ऑपरेशन करताना आत्महत्या केलेल्या महीलेचा स्कार्प सापडला तो स्कार्प त्याच महीलेचा असल्याचे महीलेच्या भावाने सांगीतले आहे परंतु अध्यापही महीला सापडली नव्हती. नदीपात्रात 15-20 फुट खोलपाणी असुन याठीकाणी दुर्गामूर्ती व गणेशमुर्तीचे मोठया प्रमाणात विसर्जन करण्यात येते यामुळे येथे मूर्तींचे फाऊंडेशन व कपडे लटकुन येत असल्याने तसेच महीलेने नदीपात्रात आत्महत्या नेमकी कोणत्या ठीकाणी केली ही जागा कुणाला निच्छित माहिती नसल्याने सर्च ऑपरेशन मध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
तरीही सर्च चालुच ठेवणार असल्याची माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे चालूच ठेवले घटनास्थळा पासुन अंदाजे एक कीलोमीटर अंतरावर शिवारात मननदीत महीलेचा मृतदेह सापडला. नाल्या पासुन वापस घटनास्थळी मननदी पर्यंत वापस अंधारातून रेस्क्यु बोटने मृतदेह आण्यासाठी शर्तीचे प्रयत्न थोडयाच वेळा मृतदेह घेऊन जिवरक्षक दीपक सदाफळे व त्यांच्या रेस्क्यु टीमने मननदीच्या पुलाजवळ हायवे नं.6 वर घटनास्थळी रात्री 8:10 वाजता पोहोचली असून अधिक तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.















