चंद्रपूर | सात कोरोना बाधितांचा मृत्यू ; 1135 पॉझिटिव्ह

• चंद्रपूर मनपा, वरोरा, ब्रम्हपूरी व भद्रावती मध्ये बाधितांची विक्रमी वाढ
• ॲक्टीव पॉझिटिव्ह 8948

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 392 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1135 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून सात बाधीतांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज शुक्रवारी मृत्यूच्या संख्येत अर्धाने घट आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 39 हजार 54 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 554 झाली आहे. सध्या 8948 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 20 हजार 367 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 74 हजार 986 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये घुग्गुस येथील 66 वर्षीय पुरुष, राजोली मुल येथील 53 वर्षीय पुरुष, विकास नगर वरोरा येथील 86 वर्षीय पुरुष, दडमल वार्ड चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष, नगीना बाग चंद्रपुर येथील 43 वर्षीय महिला, गजानन महाराज चौक चंद्रपूर येथील 47 वर्षीय पुरुष, न्यू पटोले नगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 552 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 505, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1135 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 463, चंद्रपूर तालुका 58, बल्लारपूर 81, भद्रावती 107, ब्रम्हपुरी 118, नागभिड 37, सिंदेवाही सात, मूल 26, सावली चार, पोंभूर्णा तीन, गोंडपिपरी सहा, राजूरा 25, चिमूर चार, वरोरा 155, कोरपना 15, जीवती 11 व इतर ठिकाणच्या 15 रुग्णांचा समावेश आहे.