• विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या मागणीला यश
चंद्रपूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट खंडित करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार 30 एप्रिल पर्यंत संचार बंदी आहे. दरम्यानच्या काळात कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालये बंद करण्यात आलेल्या आहेत. मात्र शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश नसल्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झालेला होता. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे शिक्षकांना शाळेत जाणे सक्तीचे करू नये अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यानी शिक्षण उपसंचालक नागपूर यांना पत्राद्वारे केली त्यानंतर शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ चे आदेश निर्गमित केले.
कोरोना संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे ब्रेक द चैन मिशन अंतर्गत शासनाने दिनांक १४ एप्रिलच्या सायंकाळी आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी नियमांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आदेश निर्गमित करण्यात केलेले आहे. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा व महाविद्यालय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कोरोना संसर्गाची दुसरी लाट तोडण्यासाठी शासनाने कठोर पावले उचललेली आहेत. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, शाळा, प्राथमिक शाळा 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत. मात्र शिक्षणाधिकारी यांनी दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी काढलेल्या पत्रानुसार 50 टक्के उपस्थिती अनिवार्य होती. त्यामुळे संचार बंदीच्या काळात शिक्षक कर्मचाऱ्यांनी शाळेत जावे की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला होता. याबाबत शिक्षक संघटनानी सुद्धा शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे . मात्र दिनांक ९ एप्रिल रोजी काढलेल्या संदर्भीय पत्रन्वये 50 टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले होते.मात्र कोरोना संसर्ग जिल्ह्यात प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे शिक्षकांना या कालावधीत ‘वर्क फ्रॉम होम’ काम करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे केली व त्यांच्या मागणीला यश आले. त्याबद्दल शिक्षकांनी सरकार्यवाह अडबाले यांचे अभिनंदन केले आहे.