घनकचरा विल्हेवाटा करीता जागा उपलब्ध करून द्या ; काँग्रेस तर्फे खासदारांना निवेदन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : खासदार बाळु भाऊ धानोरकर आज घुग्घुस भेटीला आले असता काँग्रेस अनुसूचित जाती विभागा तर्फे जिल्हाध्यक्ष पवन आगदारी यांनी शहरातील घाणकचऱ्याची समस्या कायम स्वरूपी सोडवण्यासाठी कॉलरी नंबर दोन मधील वेकोलीचा खाली पडलेली जमीन डम्पिंग यार्ड करीता उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

खासदार बाळु धानोरकर यांनी राजुरेड्डी शहर अध्यक्ष घुग्घुस, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या सह वेकोली अधिकाऱ्यांची तातळीने वी.आई.पी विश्रामगृहात बैठक घेऊन ही समस्या मार्गी लावण्यास सुचविले या बैठकीत वेकोलीचे संजय वैरागडे जि.एम.ऑपरेशन, सुजित कुमार पिसारोडी,फुलारे सब एरिया मॅनेजर, हे उपस्थित होते.