• शेतात काम करीत होते शेतकरी
• गोंडपिपरी तालुक्यातील घटना
चंद्रपूर : शेतात काम करीत असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी (16 आॅगस्ट) ला दुपारच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव शेतशिवारात घडली. मारोती चौधरी (वय ३४) व रेखा घुबडे अशी मृतकांची नावे आहेत.
गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथील लक्ष्मीकांत कलपल्लीवर यांच्या शेतात मारोती चौधरी व रेखा घुबडे हे शेतात काम करीत होते. याच सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान शेतात काम करीत असलेल्या या शेत-याच्या अंगावर विज पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही शेतकर्यांच्या पश्चात दोन मुलांचा परिवार आहे. या घटनेनी वेडगाव गावात शोककळा पसरलेली आहे. या घटनेची माहिती होताच लाठी पोलिसांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेतले आहे.