नगर परिषद निर्मिती नंतर खासदारांची घुग्घुस येथे प्रथम भेट 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला दिली भेट

घुग्घुस : खासदार बाळु भाऊ धानोरकर यांनी 16 ऑगस्ट रोजी घुग्घुस येथे भेट दिली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट दिली बाबासाहेब यांच्या प्रतिमेसमोर मेनबत्ती पेटवून अभिवादन केले तसेच उपस्थित कार्यकर्ते तसेच समाज बांधवा सोबत स्मारकांच्या विकास कामाबद्दल चर्चा केली.
या परिसरात वाचनालय तसेच एक मोठे सभागृह निर्माण करू अशी ग्वाही देऊन विकास कामाचा आराखडा तैयार करण्याची सूचना दिली.

यानंतर घुग्घुस शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्याशी येणाऱ्या निवळणुकी संदर्भात चर्चा केली व कार्यकर्त्यांना जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत उत्साहात खासदारांचे स्वागत केले.

याप्रसंगी घुग्घुस शहर अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर,दिलीप पिटलवार राष्ट्रवादी युवक अध्यक्ष,नुरुल सिद्दिकी, इर्शाद कुरेशी, प्रफुल हिकरे,रोशन दंतलवार,प्रेमानंद जोगी, बालकिशन कुळसंगे, विशाल मादर,रोहित डाकूर,देव भंडारी,साहिल सैय्यद,राकेश खोब्रागडे,अंकुश सपाटे, सचिन कोंडावार,आरिफ शेख,जुबेर शेख,अजय रॉय,शुभम घोडके, राजेश कुंटलवार,अय्युब कुरेशी,समीर शेख,दानिश कुरेशी,अविनाश सरोज,व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते