चंद्रपूर : घुग्घुस नगरपरिषदेच्या हद्दीत दिवसागणिक कोरोना संक्रमित रुगणाची संख्या झपाट्याने वाढत असून आज शनिवारी (17 एप्रिल) रोजी 37 कोरोना संक्रमित रुग्ण मिळालेले असून ऐकून 380 ऍक्टिव्ह रुग्ण घुग्घुस येथे आजघडीला आहे. त्यामुळे घुग्घूस वासीयांना सावधान होण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हातधुणे आणि शारीरिक अंतर पाळणे या त्रीसुत्रींचा नियम पाळावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
मात्र नागरिकांन मध्ये अजून ही जागृतीचा अभाव दिसून येत आहे. वॉर्डा – वॉर्डात बिनधास्तपणे बैठकांचें फळ रंगत असून नागरिकांचे बेजबाबदार वर्तणूकीमुळेच कोरोना रुग्णाची झपाट्याने वाढ होत आहे.