कोरोना तिसऱ्या लाटेपासुन बचावासाठी नागरिकांनी सुरक्षित राहावे : राजूरेड्डी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : परिसरात कोरोना महामारी अत्यंत वेगाने पसरली असून 08 मार्च ते 17 मे पर्यंत ऐकून 981 नागरिक कोरोना बाधीत झाले असून यापैकी 710 नागरिक आजारातून मुक्त होऊन सुखरूप घरी परतले व 07 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तर ऐकून 7380 लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहेत. दुसरी लाट ही धोकादायक असतांना आता पुढील काही दिवसांत तिसरी लाट येण्याची संभावना असून हे लहान मुलांना धोकादायक असल्याचे तज्ञ व जाणकारांचे मत आहे.

नागरिकांनी आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी त्यांना बाहेर फिरायला नेऊ नये, ताप, खोकला, सर्दी याकडे दुर्लक्ष करू नये, मुलांच्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यावे, स्वतः आजारी असल्यास मुलांपासून दूर रहावे.

मास्कचा नियमित वापर करावा शक्यतो गरज नसताना गर्दीत जाण्याचे टाळावे सोशल डिस्टन्स राखावे हात स्वच्छ धुवावे सॅनिटाइझरचा वापर करावा असे आवाहन घुग्घुस काँग्रेसचे अध्यक्ष राजूरेड्डी यांनी केली आहे.