घुग्घुस : प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.वाकदकर यांची बदली झाल्याने अजून त्यांच्या जागी डॉ.दामिनी शालीकराव थेरे (BAMS), श्रद्धा लक्ष्मण माडुरवार (BAMS ) यांची कंत्राटी पद्धतीने 09 सप्टेंबर रोजी घुग्घुस येथे नियुक्ती करण्यात आली.
घुग्घुस हा औद्योगिक शहर असून येथे मजुरवर्ग, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
या आरोग्य केंद्रा अंतर्गत जवळपास पंधरा गाव येतात हजारो नागरिकांच्या उपचारासाठी MBBS वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असतांना याठिकाणी BAMS नियुक्त करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घूस आकस्मिक रुग्णांची नियमित आवक लक्षात घेता या ठिकाणी MBBS Dr ची पदस्थापना देण्यात आली आहे.
आज पर्यंत MBBS वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले. मात्र पहिल्यांदाच दोन BAMS महिला वैद्यकीय अधिकारी नियुक्त झाल्याने परिसरात तर्क – वितर्काना उत आला असून सदर वैदकीय अधिकारी हे एका जिल्हास्तरीय राजकीय नेत्यांचे जवळचे असल्याने त्यांना हे संधी मिळाल्याची चर्चा होती. एकंदरीत होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी(MBBS) डॉ. कुंडू व महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. उंदीरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली.