सुनित लोहकरे यांना कला क्षेत्रातील मानाचा राज्य स्तरीय पुरस्कार

चंद्रपूर : बल्लारपूर शहरातील सुनित लोहकरे यांना आर्ट बिट्स फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा युवा कला गौरव हा कला क्षेत्रातील मानाचा राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. आर्ट बिट्स फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या माध्यमातून एका पत्राद्वारे हे सुनित लोहकरे यांना कळविण्यात आले आहे.

सुनित लोहकरे यांनी या पुर्वीही अनेक चित्रकला स्पर्धेतून पारितोषिकं पटकावलेली आहेत. ते चित्रकार आणि व्यक्ती चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. सुनित लोहकरे हे एटिडी व जिडीए ह्या चित्रकलेतील परिक्षा उत्तीर्ण आहेत. ते चित्रकलेत आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

चित्रकलेचा छंद सुनितला त्याच्या वडिलांकडूनच मिळाला आहे. प्रसिद्ध गीतकार व पत्रकार संजय लोहकरे बल्लारपूर यांचा तो मुलगा आहे.
या वर्षीचा युवा कला गौरव पुरस्कार सुनित लोहकरे यांना प्राप्त झाल्यामुळे बल्लारपूर शहरातच नव्हे तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून कलाक्षेत्रातील प्रसिद्ध चित्र कलावंत व मित्र परिवारां तर्फे सुनित लोहकरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.