आमदार भांगडियासह नऊ व्यक्ति विरोधात गुन्हयाची नोंद

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

बाईक रॅली दरम्यान काँग्रेस भाजपा आमनेसामने

चंद्रपूर : १६ आगस्ट चिमूर क्रांती शहिद स्मृती दिना निमीत्त पालकमंत्री विजय वडेट्टीवार महामार्गानजीक असलेल्या हुतात्मा स्मारक येथे शहिदांना मानवंदना देऊन मनोगत व्यक्त करीत होते. या दरम्यान आमदार भांगडिया यांचे नेतृत्वात बाईक रॅली या ठीकाणी आली.मोठ्याने घोषणा देत रॅली थांबली होती ज्यामूळे भाजपा काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला.विना परवानगी बाईक रॅली काढुन पोलिस विभागाच्या दिशा निर्देशाचे पालन केले नसल्याने आमदार भांगडिया सह त्यांच्या आठ कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद झाल्याची माहीती पोलिस विभागाकडून देण्यात आली.

चिमूर क्रांती शहिद स्मृती दिना निमीत्त शहिदांना मानवंदना देण्या करीता राज्याचे बहुजन कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा नियोजीत शासकिय दौरा होता.या नियोजीत कार्यक्रमा नुसार चिमूर महामार्ग नजीकच्या हुतात्मा स्मारक येथे मंत्री विजय वडेट्टीवार हे आपले मनोगत व्यक्त करीत होते. त्या दरम्यान आमदार किर्तीकुमार भांगडिया यांचे नेतृत्वात बाईक रॅली नेहरू चौकातुन हुतात्मा स्मारक पुढे आली.तिथुन पुढे न जाता मोठ्याने जिल्ह्या संबधी तथा इतर घोषणा देणे सुरु होते.ज्यामूळे काही काँग्रेस कायकर्ते रॅली जवळ येऊन रॅली पुढे घेऊन जाण्याचे सांगीतले. यामूळे भाजपा कार्यकर्ते सुद्धा संतापले ज्यामूळे मोठा तणाव निर्माण झाला.आता धुमचक्रि होते की काय अशी परीस्थीती निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तेक्षेप करून दोन्ही समुहांना एक मेकापासुन दुर नेले.

केंद्र ,राज्य व सवौच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशा प्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत कोणत्याही गर्दी होणाऱ्या राजकीय,धार्मीक,सामाजीक,सांस्कृतीक निवडणुक प्रचार,सभा रॅली मोर्चे यावर बंदी घालण्यात आली आहे.याउपर विना परवानगी बाईक रॅली आमदार भांगडियांच्या नेतृत्वात काढण्यात आली.यादरम्यान पोलिस विभागा कडून देण्यात आलेल्या दिशा निर्देश व आदेशाचे उल्लंघन करण्यात आले.असा ठपका ठेऊन आमदार बंटि भांगडिया,गोलु भरडकर,अजित सुकारे,राजु देवतळे ,विवेक कापसे,नैनेश पटेल,कन्हैयासिंग भौंड, पिंटु उर्फ विशाल खाटीक,स्वप्नील शेंडे या नऊ व्यक्ती विरोधात भारतिय दंड संहिता १८६,१८७,१८८,अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन इतर ३० व्यक्तींची ओळख करणे सुरु आहे.ज्यामूळे गुन्हा नोंदविलेल्या व्यक्क्तीची संख्या चौकशी अंति वाढु शकते अशी माहीती सहाय्यक पोलिस अधिक्षक नितिन बगाटे यांनी दिली.