“स्त्री शक्तीचा जागर” कार्यक्रमात उलटली महिलांची उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर : घुग्घूस महिला काँग्रेस तर्फे “स्त्री शक्तीचा जागर’ हळद कुंकु कार्यक्रमाचे आयोजन बालाजी लाँन येथे सांयकाळी 04 ते रात्री 10 वाजेपर्यंत करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटक खासदार बाळु धानोरकर व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवानीताई वड्डेटीवार हे होते प्रमुख अतिथी अखिल भारतीय काँग्रेस कमेटी सदस्य सौ.सुनीता लोढीया, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे या होत्या घुग्घूस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर,यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात आलेल्या महिलांचे हळद कुंकू लावून स्वागत करण्यात आले. मात्र अपेक्षा जास्त संख्येने महिला कार्यक्रमात आल्याने तसेच अवकाळी पाऊस आल्याने व वीज गेल्याने आयोजकांची तारांबळ उडाली
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजवलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
खासदार धानोरकर यांनी महिलांनी आता सर्वच क्षेत्रात पुढाकार घ्यावा मी माझ्या घराच्या किल्ल्या सोबत राजकारणाचा वारसा ही आपल्या पत्नीला दिल्याचे सांगत महिलांना नगरपरिषद निवळणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानीताई वड्डेटीवार यांनी 27 वर्षा पासून प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून आता महिलांनी निवडणूकीच्या तैयारीला लागावे देशाच्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीं पंचायत राज समितीत महिलांना 33% आरक्षण दिले व काँग्रेस सरकारच्या काळात 50% आरक्षण दिले त्या आरक्षणाचा आपण प्रत्यक्ष लाभ घ्यावा प्रत्येक क्षेत्रात आपण पुढाकार घ्यावा आपल्याला सामाजिक जीवनात कुठे ही अडचण येत असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
यावेळी घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यानी आपले नृत्य कौशल्य दाखविले.
सूत्र संचालन साहिल सैय्यद व शंकर नागपुरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी रंजीता आगदारी,अलका पचारे, पदमा रेड्डी, यास्मिन सैय्यद,संगीता बोबडे,विजया बंडीवार,पदमा त्रिवेणी,सीताबाई हिकरे,गीता सोदारी,पुष्पा नक्षीणे,अमिना बेगम, दुर्गा पाटील,संध्या मंडल,रिजवाना शेख,निलोफर शेख,माधुरी ठाकरे,सरिता गोहॊकर,अर्चना सरोकार,कांचन बहुराशी,वनिता रुद्रारप,रेखा रेंगुंडवार, यांनी परिश्रम घेतले तर मदतीला प्रफुल हिकरे, जावेद कुरेशी, सुरज बहुराशी, शहजाद शेख, बालकिशन कुळसंगे, विशाल मादर, नुरूल सिद्दीकी, प्रेमानंद जोगी, रोशन दंतलवार, लखन हिकरे, रंजीत राखूडे, प्रशांत सरोकार, कोंडय्या तराला, रमेश रुद्रारप, योगेश ठाकरे, देव भंडारी, अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.