घुग्घुस येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र गरिबांसाठी वरदान

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• मृतक विद्यार्थ्याच्या लाभार्थी कुटुंबियांचे मनोगत

• कुटुंबियांना मिळवून दिला 75 हजाराचा धनादेश

घुग्घुस : अमराई येथील राहणारा विद्यार्थी मिलिंद बंडू गायकवाड, वय 15 वर्षे हा जनता विद्यालय घुग्घुस येथे 10 व्या वर्गात शिकत होता. घरा शेजारीच नृत्याचा सराव करीत असताना तो खाली पडला. त्यामुळे त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले, परंतु काही दिवसांनी त्याचा उपचारा दरम्यान दिनांक 11/11/2019 रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने कुटुंबियांवार दुःखाचे डोंगर कोसळले. गरिबीची परिस्थिती असल्याने मिलिंदचे वडील बंडू गायकवाड हे ए. सी.सी. कंपनी मध्ये सुपरवाईजरचे काम करतात.

मुलाच्या मृत्युंनंतर आर्थिक विवंचनेत असताना त्याचा वडिलांनी एके दिवशी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात येऊन घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेऊन आपणास आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली. तेव्हा घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी स्वतः पुढाकार घेऊन मृतक विद्यार्थी मिलिंद गायकवाड याच्या कुटुंबीयास आर्थिक मदत मिळण्यासाठी राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा स्वखर्चाने अर्ज केला. अथक परिश्रमा नंतर या योजने अंतर्गत 75 हजाराचा धनादेश शुक्रवार 16 एप्रिल रोजी मृतक विद्यार्थ्याच्या लाभार्थी पालकास मिळवून दिला.

आर्थिक मदत मिळताच मृतक विद्यार्थ्याची आई वंदना बंडू गायकवाड यांचे अश्रू अनावर झाले. मृतक विद्यार्थ्याच्या पालकांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना घुग्घुस येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र हे खरोखरच गोर गरिबांसाठी वरदान आहे. त्यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, माजी जि. प. सभापती सौ. नितुताई विनोद चौधरी यांचे मनापासून आभार व्यक्त केले.