गुप्ता कोल वॉशरिज येथे कोरोनाचा प्रकोप

• शंभर कामगारांपैकी तेवीस कोरोना बाधित

चंद्रपूर : घुग्घुस परिसरातील व चंद्रपूर तालुक्यातील उसगाव येथील गुप्ता कोल वॉशरीज मागील काही दिवसांपूर्वीच शुरू झाले असून सध्या याठिकाणी शंभर कामगार कार्यरत आहे.

येथील पन्नास टक्के कामगार हे उसगावचे स्थायी निवासी आहेत चाचणीत बाधित निघालेल्या तेवीस कामगारांन पैकी सतरा हे उसगाव येथील असून उर्वरित लोकांचे चाचणी रिपोर्ट अजून यायची आहे.
यामुळे संपूर्ण गावाला संसर्गाचा धोका निर्माण झाला असून नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

घुग्घुस येथील रुग्ण बधितांची संख्या जवळपास चारशे इतकी झाली असून नागरिकांच्या मृत्यू संख्या ही वाढली आहे.