नायब तहसीलदार अशोक सलामे यांचा कोरोनाने निधन

चंद्रपूर : वरोरा शहरात झपाट्याने वाढलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने एक आठवड्याचा जनता कर्फ्यू घोषित लावण्यात आला होता, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचेसह अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते यामध्ये 54 वर्षीय नायब तहसीलदार अशोक सलामे ­यांचा सुद्धा समावेश होता.

कोरोनाशी झुंज देत असताना ते 18 एप्रिलला कोरोना विरोधातील लढाईत हरले, व त्यांचं निधन झालं. अनेक नागरिक कोरोनाच्या विळख्यात येत असून अनेकांनी आपला जीव गमावला असे असूनही काही नागरिक रस्त्यावर विनाकामाणे फिरत असतात, अश्या काही निष्काळजी करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना वाढत आहे, नागरिकांच्या या बेजबाबदार पणामुळे अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली आहे.