तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोन महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोन महिला वेगवेगळ्या ठिकाणी आज 19 मे ला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्यात. पहिली घटना भद्रावती तालुक्यातील घोट निंबाळा येथे घडली. आज पहाटे आठ वाजता रजनी भालेराव चिकराम (वय 35 ) रा. घोट ही महिला आपल्या सहकार्या सोबत तेंदुपत्ता संकलनात साठी आयुध निर्माणी जंगलात गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने या महिलेवर हल्ला केला.

यात एकच गोंधळ उडाल्याने महिलांची पळापळ झाली. त्यात रजनी चिकराम ही वाघाच्या हल्ल्यात घटनास्थळी ठार झाली. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांना मिळताच क्षेत्र सहायक एन वि हनुवते यांच्या टीम सह घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

दुसरी घटना सिन्देवाही वनपरिक्षेत्रातील पेंढरी कोकेवाडा बिटातील जंगलात घडली. तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केलले. ही घटना सकाळी ९ वाजता घडली. ठार झालेल्या महीलेचे नाव सिताबाई गुलाब चौखे (वय ५८) असून ती पेंढरीकोकेवाडा येथील रहीवासी आहे. सदर महीला पेढरी जंगलातील दिवानता तलाव परिसरातील महसुली गट नं ३४ मध्ये तेंदुपत्ता संकलनासाठी सकाळी गेली होती.

सदर घटनेची माहीती नवरगाव उपवन, क्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक सुनिल बुल्ले यांना माहीत होताच आपल्या चमुसह घटना स्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व प्रेत ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठविले.मृतक महीलेला पती, २ मुली असा परिवार आहे.