नगरपरिषदच्या वतीने औद्योगिक कंपनी तर्फे वॉटर टँकर : राजूरेड्डी यांच्या प्रयत्नाला यश

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत येणारे बैरामबाबा नगर,स्नेह नगर,साई नगर,शिव नगर,राम नगर,शास्त्री नगर,सुभाष नगर, बँक ऑफ इंडियाच्या मागील वस्ती, अमराई या ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई असून काँग्रेस नेते राजूरेड्डी हे मागील अनेक वर्षांपासून आपल्या खाजगी टँकरने नागरिकांना मोफत पाणी पुरवठा करीत आहे.

मात्र त्यांचा हा प्रयत्न अपुरा पडत असल्याने त्यांनी घुग्घुस नगरपरिषद प्रशासक निलेश गौड यांना विविध उद्योगातर्फे वॉटर टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली होती.

या मागणीची दखल घेवुन निलेश गौड यांनी परिसरातील उद्योगांना पत्र देऊन पाणी पुरवठा करण्याची मागणी केली असता एसीसी कंपनी एक व वेकोली दोन तर्फे वॉटर टँकर देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठीची धावपळ कमी होईल व दिलासा मिळेलअशी अपेक्षा आहे.