• भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा मांगलगावचे सरपंच प्रफुल कोलते यांची मागणी
चंद्रपूर : चिमूर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस मृत्यू संख्या वाढत आहे. ऑक्सिजन ,बेड संख्या अपुऱ्या असल्याने रुग्णांना बेड ऑक्सिजन मिळत नसल्याने जीव जात आहे. तेव्हा जिल्ह्यातील ग्राम पंचायत ला 15 व्या वित्त आयोगाचा निधी आल्याने तो निधी कोविड रुग्णांच्या उपचारासाठी खर्च करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भाजयुमो उपाध्यक्ष तथा सरपंच प्रफुल कोलते यांनी केले आहे.
15 व्या वित्त आयोगाचा निधी जिल्ह्यातील ग्राम पंचायत ला प्राप्त झाला असून त्या निधीचा वापर आरोग्य ,शिक्षण व उपजीविका साठी असून सद्या शाळा बंद आहेत. तर आरोग्य व्यवस्था कोविड साठी कार्यरत आहे
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात बेड ,ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना तालुका किंवा जिल्हा स्तरावर उपचारासाठी न्यावे लागते. अपुऱ्या व्यवस्थेने रुग्ण मृत्यू मुखी पडत आहे. अश्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन बेड साठी 15 व्या वित्त आयोगाचा निधी कोविड व्यवस्थेसाठी वळती करण्याची मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रफुल कोलते यांनी केली असून जिल्ह्यातील सरपंच यांनी केली आहे.