• चांदा आयुध निर्माणीच्या हॉस्पिटल चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करा:
• पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी
चंद्रपूर : जिह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय असून आरोग्य सेवेत जिल्हा प्रशासनाची व्यवस्था अपुरी पडत आहे. अशातच अनेक रुग्णांना वैद्यकीय सेवांकरिता अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) तसेच खाजगी रुग्णालये कोविड रुग्णांच्या सेवेत यावे यासाठी प्रयत्नशील असतांना भद्रावती येथील आयुध निर्माणी चांदाचे हॉस्पिटल चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सेवेसाठी उपलब्ध करण्याची मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
तत्पूर्वी हंसराज अहीर यांनी आयुध निर्माणी चांदा चे हॉस्पिटल ला भेट देत सर्व वैद्यकीय सेवा व सुविधांचा आढावा घेतला. कोरोना रुग्णांना आरोग्य आरोग्य सुविधा देण्यात आयुध निर्माणी चांदा चे हॉस्पिटल उपयुक्त आहे असा विश्वास व्यक्त करतांना जिल्ह्याला कोविड मुक्त करण्यासाठी प्रत्येक पाऊल हा महत्वाकांक्षी ठरेल असेही यावेळी अहीर यांनी व्यक्त केले.
हंसराज अहीर हे कोरोना रुग्णांना सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता प्रत्यक्ष कोविड सेंटर ला भेट देऊन, आयुध निर्माणी चांदा सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अखत्यारीत हॉस्पटिल इतर वैद्यकीय सेवांचा आढावा तसेच त्यामाध्यमातून कोरोना रुग्णांची सेवा घडावी या अनुषंगाने निरंतर प्रयत्नरत असल्याचे चित्र दिसत जिल्ह्यात दिसत आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या संकटावर लवकरच मात करून जिल्हा कोरोनमुक्त व्हावा तत्पूर्वी प्रत्येक रुग्णाला आवश्यक वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आपण सदैव कार्यरत राहू अशी ग्वाही यावेळी अहीर यांनी दिली.