‘एक गाव कोरोना मुक्त’ अभियानाची ‘वंधली’ गावापासून सुरवात

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

ऑल इंडिया काँग्रेस अध्यक्ष सुश्मिता देव यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कार्याचे केले कौतुक

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती. संध्याताई सव्वालाखे यांच्या संकल्पनेतून माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या 30 व्या पुण्यतिथी निमित्त “एक गाव करोना मुक्त” या भव्य अभियानाची सुरवात वरोरा – भद्रावती मतदार संघातील वरोरा तालुक्यातील ‘वंधली’ गावापासून झाली.
या अभियानाचे ऑनलाइन उदघाटन ऑल इंडिया काँग्रेस च्या अध्यक्ष मा.सुश्मिताजी देव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री नानाभाऊ पटोले, महिला व बाल विकास मंत्री मा.ना श्रीमती.यशोमती ताई ठाकूर, श्रीमती. ममता भूपेश ( मंत्री महिला व बाल विकास राजस्थान), वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री मा.ना. श्री अमित जी देशमुख, महाराष्ट्र महिला प्रदेश प्रभारी आमदार मा. प्रणिती ताई शिंदे , आकांक्षा ओला (महाराष्ट्र महिला प्रदेश प्रभारी), मा.आमदार प्रतिभाताई धानोरकर, प्रदेश महिला सचिव नम्रता आचार्य – ठेमस्कर यांची उपस्थिती होती.

ऑल इंडिया काँग्रेस च्या अध्यक्ष मा.सुश्मिताजी देव यांनी या अभियानाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या कि या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कोरोनाची भीती हि दूर होईल. मोठ्या प्रमाणात आपण ग्रामीण भागातील ग्रामस्थांना कोरोनापासून बचाव करता येईल. त्यासोबतच आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे. अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. श्रीमती. ममता भूपेश ( मंत्री महिला व बाल विकास राजस्थान), महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र महिला प्रदेश प्रभारी आमदार मा. प्रणिती ताई शिंदे यांनी या अभियानाला शुभेच्या दिल्या. येत्या काळात काँग्रेसच्या महिलांनी पुढे येऊन खंभीर नेतृत्व निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.