चंद्रपूरचे S.G. Traders विरुद्ध कारवाई; ३४ हजारांचा दंड

चंद्रपूर :  कोव्हीड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एस.जी. ट्रेडर्सचे संचालक ग्यानचंद टहलियानी यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन ३४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. १च्या सहायक आयुक्त शितल वाकडे, क्षेत्रिय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, भरत राजुरकर, रामचंद्र बोमीडवार व अतिक्रमण पथक उपस्थित होते.
यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.