घुग्घुस येथे तात्काळ Covid Care Center उभारण्यात यावे : देवराव भोंगळे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने या शहराची लोकसंख्या 50,000 हजाराच्या जवळपास आहे. सध्या घुग्घुस शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे आता पर्यंत 1,000 हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्ण घुग्घुस शहरात आढळले आहे तर काही रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यूही झालेला आहे.

घुग्घुस शहरात विलगीकरणाची सुविधा नसल्याने येथील कोरोना बाधित रुग्णांना विलगीकरणासाठी चंद्रपूर जिल्ह्यात जावे लागते. काही कोरोना बाधित रुग्णांना नाईलाजाने गृह विलगीकरणात राहावे लागत आहे. अश्या रुग्णांची संख्या 290 आहे.

घुग्घुस शहरात गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांन मुळे त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आलेला आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केव्हाही येऊ शकते सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ढिसाळ नियोजन असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तीच परिस्थिती पुन्हा उद्धभवू नये यासाठी आपण पूर्वनियोजीत तयारीत असणे अत्यंत आवश्यक आहे.
तरी घुग्घुस शहरात तात्काळ कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार तथा चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.