महाज्योती मध्ये पूर्ण वेळ व्यवस्थापकीय संचालक नियुक्त करावा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
• महाज्योतीमध्ये अधिछात्रवृत्ती २०२१ च्या जाहिरातीमधील त्रुटी दुर कराव्या !!
• समन्वयक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांची मागणी
• मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मागास बहुजन कल्याण मंत्रयांना निवेदन

चंद्रपूर : शासनाने ओबीसी भटक्या जाती जमातीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्थापन केलेल्या महाज्योती या प्रशिक्षण संस्थेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे राज्यातील १५५ कोटी पैकी १२५ कोटीचा निधी अखर्चीक असलयामुळे शासनाकडे परत गेला आहे.

याची शासनाने गंभीरपणे दखल घेवुन शासनाकडे परत आलेला १२५ कोटीचा निधी महाज्योतीकडे पून्हा वळती करावा आणि याबाबत योग्य ती कार्यवाही करून ओबीसी व भटक्या विमुक्त गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय द्यावा यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी मा. मुख्यमंत्री नामदार उध्दवजी ठाकरे, मा. उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व मा. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार विजयजी वडेट्टीवार यांना निवेदन दिले आहे. महाज्योती प्रशिक्षण संस्थेत पुर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नियुक्त करावा जेणेकरून दर महिण्याला संचालक मंडळाच्या नियमित सभा होऊन ओबीसी विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेता येईल असेही निवेदनात म्हटले आहे.

तसेच नोंदणी वर्ष २०१७ आणि २०१८ या सत्रातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती ( MJPRF ) २०२१ चा लाभ देण्यात यावा. तसेच ह्या अधिछात्रवृत्तीसाठी महाराष्ट्रातील ओबीसी घटकांचा विचार करता सारथीप्रमाणेच वाढीव जागांची तरतूद करण्यात यावी म्हणजेच एकुण ५०० जागा वाढविण्यात याव्या. तसेच जाहिरातीतील इतर वृट्या दुर करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी व ओबीसी, भटक्या जाती जमातीतील सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असेही निवेदनात म्हटले आहे.