देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक योग दिवस साजरा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : चंद्रपूर मार्गांवरील मल्हारगड दत्त मंदिर देवस्थान परिसरात घुग्घुस येथे सोमवार 21 जून रोजी सकाळी 6 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम 2015 मध्ये 21 जून हा वर्षभरातील सर्वात मोठा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन जगाला केले होते. आज जगातील सर्व देशात हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. द्विप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले आज आपण 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहो. भाजपाच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक गावांमध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात झाले. सध्या कोरोना संकटात योगाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. योग ही आपल्या देशाची ओळख होती, ती आज जगाच्या काना कोपऱ्यात पोहचली आहे. करे योग रहे निरोग.

लोकलेखा समितीचे अध्यक्ष मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व योग शिक्षकांचा सत्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, वाफारा मशीन देऊन करण्यात आला.

यावेळी युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, माजी जिप सभापती सौ. नितुताई चौधरी योग शिक्षक अनिल नित, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी जि.प. सदस्य चिन्नजी नलभोगा, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, सुचिता लुटे,वैशाली ढवस, प्रेमलाल पारधी,डॉ. ठाकरे, सुमन वऱ्हाटे, वंदना बोबडे, बबन कोयाडवार, हेमराज बोंबले, प्रवीण सोदारी, सिनू कोत्तूर, निरंजन नगराळे, पांडुरंग थेरे,दशरथ असपवार, भारत साळवे, तुलसीदास ढवस, रवी चुने, हेमंत पाझरे,सुशील डांगे उपस्थित होते.